वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दिनांक १ सप्टेंबर रोजी लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांच्या हस्ते कै. विनायकराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांनी कै. विनायकराव पाटील यांच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, मराठवाड्याच्या विकासात विनायकराव पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले केंद्रबिंदू मानून समाजातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करून अनेक महाविद्यालय मार्फत ग्रामीण भागात उच्च शिक्षण उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.