Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा

admin by admin
14/01/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात शनिवारी (दि.१४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी माजी समाजकल्याण सभापती हरीश डावरे, जिल्हा रोजगार आघाडीचे अध्यक्ष उत्तम भालेराव, रोजगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या रंजना हासुरे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अभिजित लोभे, प्रकाश भगत, बाबा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत भारताचे संविधान व आक्रोश चेतनेचा ही दोन पुस्तके भेट देऊन करण्यात आले. नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांनी केले.

नामविस्तार दिन
संजय नाना शितोळे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार सार्थक होण्यासाठी सामाजिक समता प्रस्थापित होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. रंजना हासूरे यांनी विद्यापीठाचा नामविस्तार होण्यासाठी झालेल्या संघर्षावर प्रकाश टाकून पुरोगामी विचारांची समाजाला असणारी आवश्यकता व महत्व आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पटवून दिले. जगदीश पाटील यांनी आपल्या भाषणात जातीयता संपवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे सांगून गोवोगावी संविधान ग्रंथाचा सप्ताह झाल्यास देशाची एकात्मता व प्रगती होण्यास वेळ लागणार नाही असे आग्रही प्रतिपादन केले. हरीशजी डावरे यांनी संविधानाचे महत्व पटवून देऊन सामाजिक व राजकीय स्थितीवर विचार मांडून संविधानाचे रक्षण करणे सद्यकाळाची गरज असल्याचे ठाम सांगितले. नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आले होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थीनींनी आंबेडकरी जलसा व भिमगीत यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

कोण होणार महाराष्ट्र केसरी ? पहा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार ! पहा LIVE कुस्ती

Next Post

सालेगाव येथील डॉ. ब्रिगेडियर शिवाजी भालेराव ट्रस्ट येथे विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

सालेगाव येथील डॉ. ब्रिगेडियर शिवाजी भालेराव ट्रस्ट येथे विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's