वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क – लोहारा / सुमित झिंगाडे
लोहारा शहरातील भावसार समाजातील सुरज हरी पुकाळे या तरुणाची राज्य सुरक्षा दलात निवड झाली आहे. त्यानिमित्ताने त्याचा समाज बांधवांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भावसार समाज अध्यक्ष शिवराज झिंगाडे, गंगाधर झिंगाडे, दिगंबर भिंगे, प्रशांत माळवदकर, अक्षय माळवदकर, सुरज माळवदकर, उत्तरेश्वर उपरे, आदेश माळवदकर आदी समाजबांधव उपस्थित होते.