वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाआवास अभियानात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल लोहारा पंचायत समितीला जिल्हास्तरीय उत्कृष्ठ तालुका प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. उस्मानाबाद येथे स्वातंत्र्य दिनी सोमवारी (दि .१५) आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी या हा पुरस्कार स्वीकारला.
२० नोव्हेंबर २०२१ ते १० जून २०२२ या कालावधीत महाआवास अभियान ग्रामीण टप्पा २.० राबविण्यात आले होते. सदर अभियान कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना जिल्हास्तरावरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनी उस्मानाबाद येथे आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले. लोहारा तालुक्याला एकूण तीन पुरस्कार मिळाले आहेत. लोहारा पंचायत समितीला जिल्हास्तरीय उत्कृष्ठ तालुका प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी या हा पुरस्कार स्वीकारला. तसेच आष्टाकासार ग्रामपंचायतला उत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार तर जेवळी क्लस्टर ला सर्वोत्कृष्ट क्लस्टर प्रथम पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे आदी उपस्थित होते.