लातूर :
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व लातूर जिल्हा कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. पैलवान रावसाहेब मुळे यांच्या स्मरणार्थ लातूर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कुस्ती स्पर्धा अंकुली ता.जि.लातूर येथे दि.२७ आणि ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील कुमार महाराष्ट्र केसरीसाठी ५५ किलो वजन गटात बाळासाहेब जमादार ११वी कला, प्रथम गणेश धायगुडे ८१ किलो वजन गटात प्रथम, शंकर कतलाकुटे, १२ वी कला ७१ किलो वजन गटात द्वितीय तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी ५७ किलो माती गटात आकाश गड्डे प्रथम ६५ किलो वजन गटात महेश तात्पुरे प्रथम, ७९ किलो वजन गटात विष्णू तातपूरे प्रथम, ६१ किलो वजन गटात प्रणव जाधव द्वितीय, ७९ किलो वजन गटात प्रदीप गोरे द्वितीय व ८६ किलो वजन गटात तुकाराम महानवर द्वितीय आले असून त्यांची निवड झाली आहे.
या सर्व विजयी खेळाडूंचे महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक शिवशंकर वैजनाथप्पा खानापुरे आणि ॲड.श्रीकांत तमन्नाप्पा उटगे यांच्या हस्ते शाल व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य बालाजी जाधव, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.नल्ला भास्कर रेड्डी, डॉ.दीपक चाटे, डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.आनंद शेवाळे, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, प्रा.आशिष शिरसागर, डॉ.कैलास पाळणे, विष्णू तातपुरे, संदीप मोरे आदीची उपस्थिती होती. या सर्व विजय खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख डॉ.नल्ला भास्कर रेड्डी, डॉ.गुणवंत बिरादार आणि प्रा. आशिष शिरसागर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळत आहे.