वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी लोहारा पंचायत समितीसमोर सोमवार (दि. ८) पासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
याबाबत लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून १० ऑगस्ट २०२० च्या शासन निर्णयानुसार मागील फरकासहीत वेतन शंभर टक्के द्यावा, ग्रामपंचायत हिस्सा ५० टक्के व २५ टक्के वेतन द्यावे, राहणीमान भत्ता प्रति माह द्यावे, ग्रामपंचायत हिस्सा भविष्य निर्वाह निधी द्यावा, शासन हिस्सा भविष्य निर्वाह निधी द्यावा या मागण्याचे निवेदन वारंवार देण्यात आले. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने सोमवार (दि.८) पासून लोहारा पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात संघटनेचे तालुकाध्यक्ष बबन बाबर, उपाध्यक्ष कंठय्या स्वामी, सचिव नामदेव कोळी, सिद्राम बिरीजदार, जैनुद्दीन कोतवाल, जगनाथ कागे, हानिफ पटेल, भगवान सोमवंशी, धनराज सुर्यवंशी, स्वप्निल हाबिले, कमलाकर देशपांडे, मनोज राजपुत, आप्पाराव भोजने, मारुती नाथकोडे, राम पाटोळे, धुमानसिंग आडे, नागनाथ बबले, राजाबाई वाघमारे, सुधाकर गुंजोटे, सुभाष कदम यांच्यासह अनेक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या उपोषणास गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी उपोषणात सहभागी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.