वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कंत्राटी पद्धतीने वायरमन ट्रेड शिकाऊ कामगार म्हणून कंत्राटदाराला सांगुन कामावर घेतो असे म्हणुन पंधरा हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणी लोहारा येथील महावितरण सबस्टेशन मधील लिपिकास गुरुवारी (दि. ३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांना कंत्राटी पद्धतीने वायरमन ट्रेड शिकाऊ कामगार म्हणून कंत्राटदारांला सांगुन कामावर घेतो असे म्हणुन यातील तक्रारदार यांच्याकडे लोहारा येथील महावितरण सबस्टेशन मधील लिपिक अमर पटाडे याने पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करून पंधरा हजार रुपये लाचेची रक्कम गुरुवारी (दि.३) लोहारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वत: पंच व साक्षीदार समक्ष स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. या पथकात सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक हुलगे, इफ्तकार शेख, सचिन शेवाळे, सिद्धेश्वर तावासकर, नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे आदींचा सहभाग होता. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.