वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक संगिता क्षीरसागर व राजश्री साळुंके यांना जिल्हास्तरीय गटप्रवर्तक पुरस्कार जाहीर झाला आहे. उस्मानाबाद येथील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी (दि.११) सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
सन २०२०- २१ कालावधीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना देण्यात येणारे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे वितरण उस्मानाबाद येथील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी (दि.११) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. लोहारा तालुक्यातील माकणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक संगिता क्षीरसागर व राजश्री साळुंके यांना जिल्हास्तरीय गटप्रवर्तक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गटप्रवर्तक राजश्री साळुंके व संगिता क्षीरसागर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.