वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी शपथ घेतल्याने लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शुक्रवारी (दि.१) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानिमित्त लोहारा शहरात भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवुन घोषणाबाजी करीत मोठ्या उत्साहात जल्लोष करून फटाक्याची आतषबाजी केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनकर जावळे पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, नेताजी शिंदे, शिवशंकर हत्तरगे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, एससी मोर्चा तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य कमलाकर सिरसाट, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, प्रमोद पोतदार, प्रशांत लांडगे, मंगेश महाजन, सुधाकर पोतदार, भोजप्पा कारभारी, नागनाथ लोहार, सुधाकर पोतदार,
अप्पाराव पाटील, राजेंद्र सुर्यवंशी, भोसगा तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत मनाळे, सुनील लोळगे, नितीन दंडगुले, ओबीसी जिल्हा सदस्य सुरेंद्र काळाप्पा, युवराज चौगुले यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.