वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते शनिवारी (दि. २६) मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतिश भाऊ चव्हाण यांच्या वतीने विशेष घटक योजनेतून देण्यात आलेल्या निधीच्या विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले.
लोहारा तालुक्यातील माकणी येथे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतिश चव्हाण यांनी त्यांच्या विशेष घटक योजनेच्या निधीतून रस्त्याच्या कामासाठी निधी देण्यात आला आहे. या कामाचे उद्घाटन शनिवारी ( दि. २६) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर साठे, प्रा. सतिश इंगळे, तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडीत ढोणे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, ग्रा.पं. सदस्य अशोक साठे, बाळू कांबळे, सरदार मुजावर, अभिमन्यु कुसळकर, अँड. दादासाहेब जानकर, अच्युत चिकुंद्रे, महेश साठे, ग्रामविकास अधिकारी तुकाराम जगताप, कर्मचारी प्रदिप पाटील, मनोज राजपूत, रणजित साठे, जीवन कांबळे आदी उपस्थित होते.