Vartadoot
Saturday, January 31, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

राष्ट्रवादी काँग्रेसवर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे – जयंतराव पाटील

admin by admin
04/11/2022
in महाराष्ट्र, राजकीय
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टीका होत आहे असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला शुक्रवार (दि.४) पासून शिर्डी येथे सुरुवात झाली. या शिबिराच्या सुरुवातीला झेंडावंदन पार पडले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादी पक्षाला २३ वर्ष झाली आहेत. आदरणीय शरद पवारसाहेब या शिबिराला कालच येणार होते. मात्र ते उद्या येऊन मार्गदर्शन करतील असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले. राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले, पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना सरकारला मदत द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत व अस्वस्थ आहे. याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला निवेदन दिले. मात्र सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही. याबद्दल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोहोचवा, ती लोकांपर्यंत जायला हवीत असे आवाहनही जयंतराव पाटील यांनी यावेळी केले.


शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. त्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे एका फोनवर गुवाहाटीला गेले हे जाहीर सांगतात. यावरून या बंडामागे कोण होतं हे लक्षात येते असेही ते म्हणाले. या शिबिराला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनिल तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार फौजिया खान,

खासदार वंदना चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार आशुतोष काळे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, पक्षाचे सर्व आमदार, माजी आमदार, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रवक्ते, सरचिटणीस, फ्रंटल सेलचे राज्यप्रमुख, संघटक सचिव, महिला प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष, युवती प्रदेशाध्यक्ष, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आदींसह सर्व निमंत्रित उपस्थित होते.
———


‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय शिबिराची शुक्रवारी सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांची क्षणभराची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अचानक झालेली भेट संपूर्ण कार्यक्रमाला व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन गेली. आजार, व्याधी, दुःख, त्रास असा कोणताही शब्द ज्या व्यक्तीला जनमानसात मिसळण्यापासून विभक्त करू शकत नाही, अशा आदरणीय शरद पवार साहेबांनी पक्षाच्या दोन दिवसाच्या शिबिराला पहिल्या दिवशीच हजर राहून पुन्हा एकदा आपला शब्द राखून दाखवला. हीच त्या आधारवडाची खरी ओळख आहे अशी भावना व्यक्त होत आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: राज्यस्तरीय शिबिरराष्ट्रवादी काँग्रेसशिर्डी
Previous Post

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई

Next Post

उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्याप्रमाणे लोहारा तालुक्यातही विशेष मोहीम राबवण्यात यावी

Related Posts

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद
निवडणूक

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद

26/01/2026
पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक
निवडणूक

पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक

24/11/2025
भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी
निवडणूक

भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी

06/11/2025
शिवसैनिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहावे – मा.आ.डॉ. राजन साळवी
राजकीय

शिवसैनिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहावे – मा.आ.डॉ. राजन साळवी

28/07/2025
भाजपाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र पाटील यांची निवड
राजकीय

भाजपाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र पाटील यांची निवड

15/07/2025
लोहारा तालुक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत
निवडणूक

लोहारा तालुक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत

11/07/2025
Next Post

उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्याप्रमाणे लोहारा तालुक्यातही विशेष मोहीम राबवण्यात यावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's