वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील दयानंद स्वामी यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांनी लोहारा तालुकाध्यक्ष पदी दयानंद स्वामी यांची निवड केल्याचे नियुक्तीपत्र दिले आहे. रविवारी ( दि.२१) लोहारा येथे आयोजित कार्यक्रमात स्वामी यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, माजी सरपंच नागन्ना वकील, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, उपनगराध्यक्ष आयुब शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. आपण तालुका, गावपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करावी व शाखा स्थापन कराव्यात असे या नियुक्तीपत्रात म्हणले आहे. यावेळी नगरसेवक जालिंदर कोकणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शरीफा सय्यद, हाजी बाबा शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.