वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क – लोहारा / सुमित झिंगाडे
23 वी सिकई मार्शल आर्ट राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच
जम्मू येथे स्पोर्ट स्टेडियम येथे दि. 1 ते 4 जानेवारी ला पार पडली. या पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी महेबूब बिस्मिल्ला मोमीन याने लोबो या प्रकारात रजत पदक व एरोस्कोय या प्रकारात रजत पदक पटकावले.
या प्रसंगी सिकाई मार्शल आर्टचे सचिव मीर नजीर सर, महाराष्ट्र अध्यक्ष मझहर खान व मार्गदर्शक महम्मदरफी शेख यांच्या हस्ते पदक देऊन सत्कार करण्यात आला.