Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोकमंगल कारखान्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास भूकंपग्रस्त कृती समितीचा जाहीर पाठिंबा – लोहारा तहसिलदार यांना दिले निवेदन

admin by admin
09/11/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील होळी येथील शेतकरी शुक्रवारी (दि. ११) लोकमंगल कारखान्याविरोधात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनास भूकंपग्रस्त कृती समितीने पाठिंबा दिला आहे. याबाबत त्यांनी बुधवारी (दि.९) लोहारा तहसिलदार यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा व लोहारा परिसरातील गतकाही वर्षापासून अतिरिक्त उसाच्या प्रश्नाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी प्रति शेअर्स २५ हजार रुपये प्रमाणे खरेदी करून लोकमंगल माऊली शुगर लिमिटेड लोहारा कारखाना उभा केला. तसेच खेड व लोहारा परिसरातील शेतकऱ्याने आपली जमीन कारखान्यासाठी कवडीमोल भावाने परिसरातील शेतकऱ्यांना चांगली दिवस येतील व आपल्या मुलाबाळांना रोजगार उपलब्ध होईल या उदात्त हेतूने कारखान्यास जमिनी व भाग भांडवल उपलब्ध करून दिले. परंतु सद्यस्थितीचा विचार केले असता कारखाना प्रशासनाकडून मूळ हेतू बाजूला सारून नफेखोरीचा गोरख धंदा चालवत असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील शेतकरी कारखाना प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे वैफल्यग्रस्त होऊन आंदोलनाच्या भूमिकेत उभे राहत आहेत. लोकांच्या जनभावनेचा विचार केला असता कारखाना प्रशासनाला पुढील मागण्या सादर करत आहोत.
१. सन २०२१- २२ उस गळीत हंगामाचा अंतिम दर परिसरातील इतर कारखान्याप्रमाणे देण्यात यावा.
२. सन २०२२- २३ ची चालू गळीत हंगामाची पहिली अनामत उचल देण्यात यावी.
३. उसाच्या वजन काट्यातील गैरसमज जाहीरपणे दूर करण्यात यावे.
४. कारखान्याची रिकवरी तपासणी यंत्रणा साखर आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणामध्ये ठेवण्यात यावी.
५. कारखान्याच्या समोरून जाणारा लोहारा ते माकणी रस्त्यावरील वाहनचालकांना आपल्या कारखान्याच्या बग्यासच्या धुळीचा व कचऱ्याचा प्रचंड त्रास होत असून त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय करावा अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. तसेच होळी परिसरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास भूकंपग्रस्त कृती समितीचा जाहीर पाठिंबा असून सदरील आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, उपाध्यक्ष सुनील साळुंके, कार्याध्यक्ष सतीश मनाळे यांच्यासह सलमान सवार, महेश स्वामी, सचिन रणखांब, बालाजी मातोळे आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: भूकंपग्रस्त कृती समितीलोकमंगल साखर कारखाना
Previous Post

जेवळी येथील गुरू सिद्धेश्वर विरक्त मठात दिपोत्सव साजरा

Next Post

नागराळ येथील धोकादायक पुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

नागराळ येथील धोकादायक पुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's