वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथे शनिवारी (दि.२५) कृषी संजीवनी सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे. कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत बीबीएफचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथे या कृषी संजीवनी सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी सोयाबीन पेरणी बीज प्रक्रिया करुन दाखविली. हवामान बदलानुसार शेती तंत्रज्ञानात बदल करणे उदाहरणार्थ बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करावी, जिवाणू संवर्धन व रासायनिक प्रक्रिया व पिकानुसार योग्य तणनाशकाचा वापर याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागाच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी मोहीम, बीबीएफ पेरणी यंत्रधारक शेतकरी, ट्रॅक्टर चालक व मालक यांचे दुसरे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी शिवाजी तारळकर, कृषी पर्यवेक्षक जी.एस. सगर, एन.बी. पाटील यांनी बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी करण्याचे फायदे व बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पेरणीपूर्वी बियाणांस रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया कशी करावी तसेच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता जमिनीत पुरेशी ओल व सलग पाऊस ८० ते १०० मी.मी. झाल्याशिवाय ३-४ सें.मी. खोलीवर बिया पडतील अशा पद्धतीने पेरणी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच शेखर पाटील, अर्जुन रसाळ, नितीन रसाळ, गणेश पाटील, हनुमंत सूर्यवंशी, रोहन जमादार, सुग्रीव पाटील, अनिल पाटील, पवन कुमार, महादेव रसाळ, ज्ञानेश्वर रसाळ, गणपती पाटील, पंढरी मुरटे, सतीश रसाळ आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.