लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथे शुक्रवारी (दि.७) विमा ग्राम पुरस्कार नामफलकाचे उद्घाटन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोपवाटीकेचाही शुभारंभ करण्यात आला.
यावेळी विमा ग्राम पुरस्कार निधी २५ हजार रूपये मधून गावातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची टाकी देण्यात आली. या टाकीच्या कटटयाचे बांधकामसाठी कै. गयाबाई रावसाहेब पाटील बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था लोहारा खु यांच्या वतीने निधी देण्यात आला. सदर कामाचा शुभारंभ तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व एलआयसी शाखा प्रबंधक बि. बि. कवडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच श्रीराम मंदिरासमोर गावातील नागरीकांना बसनेसाठी कटटयाचे बांधकाम साठी कै. गयाबाई रावसाहेब पाटील बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था लोहारा खु यांच्या वतीने सदर कामाचा शुभारंभ ह. भ. प. शिवाजी महाराज लोहारेकर यांच्या हस्ते करण्यात आला. रोपवाटिकेसाठी कै. गयाबाई रावसाहेब पाटील बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था लोहारा खु यांच्या वतीने विनामूल्य जागा व रोपवाटिकेस लागणारे पाणी विनामूल्य देण्यात येणार आहे. तसेच विमा ग्राम पुरस्कार निधी मधुन मिळालेल्या टाकीस पाणी पुरवठा करणेसाठी विनामूल्य पाणी पुरवठा कै. गयाबाई रावसाहेब पाटील बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था लोहारा खु यांच्या वतीने करण्यात येणार असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेखर पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळी इंगळे होते. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, श्री. तारळकर, भागवत गायकवाड, मंडळ अधिकारी श्री. मणियार, कृषी सहाय्यक निळकंठ पाटील, उप शाखा अधिकारी एस. एस. मांडवे, विमा प्रतिनिधी मार्गदर्शक बि. डि. हजारे, विमा प्रतिनिधी व संस्थेचे अध्यक्ष शेखर पाटील, संस्थेचे सचिव शोभा पाटील, उपाध्यक्ष उद्धव पाटील, सदस्य दादासाहेब पाटील, संचालक ज्योती पाटील, काशीनाथ कांबळे, सरपंच सचिन व्यंकट रसाळ, उपसरपंच सचिन बा. रसाळ, ग्रामसेवक घनश्याम कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य आर्चना संभाजी पाटील, पुष्पा दादासाहेब पाटील, हणमंत ज्ञानदेव सुर्यवंशी,
लक्ष्मी ज्ञानेश्वर रसाळ, बिरूदेव सुर्यवंशी, माजी चेअरमन किसन रसाळ, मुकुंद इंगळे, भास्कर रसाळ, महादेव पाटील, सुग्रीव पाटील, विजय मुरटे, नामदेव मुरटे, नितीन रसाळ, पंढरी रसाळ, सुरज पाटील, धनाजी सुर्यवंशी, ओंकार पाटील, सुमीत पाटील, अनिल पाटील, समर्थ रसाळ, योगेश पाटील, श्रीहरी पाटील, आण्णासाहेब रसाळ, प्रभाकर रसाळ, दत्ता आरगडे, भरत रसाळ, इंदुताई आरगडे, बालाजी मुरटे, वैभव पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन बळी गोरे यांनी तर पोलीस पाटील बिरुदेव सूर्यवंशी यांनी आभार मानले.