Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा (खु) येथील आरोग्य वर्धिनी केंद्र ठरले १०० टक्के पात्र नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे तालुक्यातील दुसरे आरोग्य वर्धिनी केंद्र

admin by admin
20/11/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे लोहारा(खु) आरोग्य वर्धिनी केंद्र (उपकेंद्र) येथील १८ वर्षांवरील सर्व पात्र लाभार्थींना कोविड लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट शुक्रवारी ( दि. १९) पूर्ण करण्यात आले. त्यामुळे लोहारा (खु) उपकेंद्र १०० टक्के पात्र नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे तालुक्यातील दुसरे आरोग्य वर्धिनी केंद्र ठरले आहे.
लोहारा तालुक्यातील लोहारा (खु) आरोग्य वर्धिनी केंद्र अंतर्गत लोहारा (खु), मोघा(बु), मोघा(खु) या गावांचा समावेश होतो. येथील एकूण १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या १७९८ असून सर्व पात्र लाभार्थींना लसीकरण करण्यात आले. लोहारा (खु) आरोग्य वर्धिनी केंद्रातील आरोग्य विभागातील टीम सदस्य समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली शिंदे, आरोग्य सेविका जी. एस. काळे, आरोग्यसेवक एस. आर. जवादे, अर्धवेळ परिचर छाया पवार, आशा स्वयंसेविका मनिषा इंगळे, जिजाबाई गोरे, पद्मिनी जाधव, अनिता बाबळे, लक्ष्मी रसाळ यांनी मिशन कवच कुंडल तर हर घर दस्तक अंतर्गत नियमित सत्र तसेच मोबाईल टीमद्वारे नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले. लोहारा (खु) चे सरपंच सचिन रसाळ, ग्रामसेवक जी. डी. कोकाटे, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी रोहन जमादार यांनी घरोघरी आरोग्य विभागाच्या टीम सोबत फिरून लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच मोघा येथील सरपंच सचिन गोरे व ग्रामसेवक एम. व्ही. कदम यांचे सहकार्य लाभले.
प्राथमिक आरोग्य केंद्र कानेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका बंदिछोडे यांनी मोबाईल टीम उपलब्ध करून देत क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या टीमला प्रोत्साहन दिले. तसेच स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथील प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी त्यांची मोबाईल टीम पाठवून जनजागृती तसेच लसीकरण करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच हॅलो मेडिकल फाऊंडेशन, एनएसई फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांनीही लसीकरणाबाबत जनजागृती केली. दि. १९ नोव्हेंबर पर्यंत लोहारा तालुक्यातील एकूण आठ गावातील १०० टक्के पात्र लाभार्थींना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून यात आरणी, नागराळ (लो), कास्ती खुर्द, बेंडकाळ, मोघा (बु), मोघा (खु), सालेगाव, लोहारा खुर्द या गावांचा समावेश आहे.

———-
लोहारा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठित नागरिक यांचा सक्रिय सहभाग मिळाला तर या महिनाअखेर तालुक्यातील पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल.

डॉ. अशोक कटारे,
तालुका आरोग्य अधिकारी,

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कोविड १९ लसीकरण
Previous Post

शेतकऱ्याने मागितली गांजा लागवड करण्याची परवानगी

Next Post

लोहारा येथे हेल्थ फिट ग्रुपच्या वतीने मोफत बॉडी चेक अप व मार्गदर्शन शिबिर संपन्न

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा येथे हेल्थ फिट ग्रुपच्या वतीने मोफत बॉडी चेक अप व मार्गदर्शन शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's