लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि.५) जगदंबा मंदिर ट्रस्ट लोहारा यांच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एम. करजखेडे, सतिश गिरी, जगदंबा मंदिर ट्रस्टचे प्रविण कांबळे, शिवराज झिंगाडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, सुपरवायजर संजय साळुंखे, कनिष्ठ सहाय्यक बालाजी साळुंके, प्राचार्य शहाजी जाधव, आशा सुपरवायझर शकिला पटेल, अदिनाथ फुलसुंदर, माधव सिरसाठ, दिलीप फुंडिपल्ले, रियाज खडीवाले, प्रतिक गोसावी, सागर गिरी, स्वप्नील नारायणकर आदी उपस्थित होते.