लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची सह. पतसंस्थेची १८ वी वार्षीक सर्वसाभारण सभा रविवारी (दि.२८) भारत माता मंदीर लोहारा येथे चेअरमन राम मुसांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे, हायस्कुल शिक्षक सोसायटीचे चेअरमन व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एल.जी. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त सभासद, प्रत्येक केंद्रातुन एक गुववंत शिक्षक पुरस्कार, आदर्श सेवक, आदर्श शाळा व गुणवंत सभासद पाल्याचा सत्कार करण्यात आला.
गुणवंत शिक्षकांना सन्मानचिन्ह, प्रमानपत्र देउन गौरवण्यात आले. तसेच गुणवंत सभासद पाल्यांना प्रमानपत्र व वाचनिय पुस्तक देउन गौरवण्यात आले. कार्यक्रमात उपनगराध्यक्ष आयुब शेख, मनोहर वाघमोडे, एल.जी. चव्हाण यांनी संस्थेच्या प्रगतीचे कौतुक केले.
पतसंस्थेचे एकुण भागभांडवल सात कोटी रूपये आहे. कर्जाचा व्याजदर ९% आहे. कर्ज मर्यादा दहा लक्ष रुपये आहे. तातडीचे कर्ज एक लक्ष रुपये आहे. कर्जदार सभासद कोणत्याही कारणाने मयत झाल्यास दहा लक्ष रुपये व डी.सी.पी.एस सभासद मयत झाल्यास साडे बारा लक्ष रुपये देण्याची कर्ज सुरक्षा योजना पतसंस्थेची आहे. एसएमएस सुविधा सुरु केली आहे. संस्थेच्या ईमारतीचे बांधकाम अंतिम टप्यात आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. पतसंस्थेची ही प्रगती पाहुन सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक विकास घोडके यांनी केले. सुत्रसंचालन व्हाईस चेअरमन सुर्यकांत पांढरे यांनी केले. अहवाल वाचन सचिव व्ही.एस. चंदनशिवे यांनी केले. संचालक डी.एम. पांचाळ यांनी आभार मानले. यावेळी संचालक सी.जी. कदम, डी.एम. फावडे, सी.जी. माळी, जे.एम. गायकवाड, वर्षा माने, वंदना अकोसकर, गीतांजली मोटे यांच्यासह सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपीक रविंद्र कोकणे, सेवक किरण दासिमे यांनी परीश्रम घेतले.