आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये बियाणे २०२३ योजनेतील शेत तिथे पौष्टीक तृणधान्य मोहिम अंतर्गत लोहारा तालुक्यात बियाणे वाटप करण्यात आले.
या योजनेच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना सखी अन्न सुरक्षा मॉडेल अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोडो, बाजरी, राजगिरा, ज्वारी इत्यादी तृणधान्ये कृषी विभाग आणि स्वयंम शिक्षण प्रयोग उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हे बियाणे तालुक्यातील बेंडकाळ, मार्डी , कास्ती खुर्द, सालेगाव येथे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक निकम सर, तालुका समन्वयक आशा जाधव, रेखा सूरवसे आदींनी मार्गदर्शन केले.यासाठी गावातील लिडर लक्ष्मी मोरे, पल्लवी साळुंखे, रेहाना मुल्ला, दिव्या वाघमोडे यांचे सहकार्य लाभले.