लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार पासूनकामबंद आंदोलन सुरू केले आहे. लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर हे आंदोलनसुरू आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत मधील लिपिक, पाणीपुरवठा कर्मचारी, शिपाई, सफाई कामगार यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी दि.१८ ते २० डिसेंबर या कालावधीत कामबंद आंदोलन करणार असल्याचे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविले होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका, जि.प. कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, निवृत्तीवेतन लागू करावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करणे आदींसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी म. रा. ग्रा. पं. कामगार सेनेच्या वतीने बबन बाबर, नामदेव कोळी, सय्यद मजीद, स्वप्नील हावळे, मनोज राजपूत, जगन्नाथ कागे, नागनाथ बाबळे, हानिफ पटेल, बालाजी देडे, गोविंद पवार, जयनोद्दीन कोतवाल, हनुमान कोळी, सचिन जाधव, कमलाकर देशपांडे, महादेव खरोसे, विजय पवार, ज्ञानेश्वर मोरे, बाबुराव सुतार, अभिषेक औरादे, मुरली साळुंके आदी कर्मचारी उपस्थित होते.