वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात बुधवारी (दि.१३) गुरु पोर्णिमा उत्सवा निमित्त मठाधीश श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी भर पावसातही पंचक्रोशीतील भाविक भक्ताची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या या परिसरात वीरशैव लिंगायत संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. वीरशैव धर्मातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा जोपासण्यासाठी अद्यापही येथे मठ परंपरेला महत्त्व आहे. भूकंपात जेवळी येथे प्राणहानी बरोबरच मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाले होती. यात येथील बेन्नीतुरा नदीकाठी असलेल्या श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाचे ही नुकसान झाले होते. जेवळी गावच्या पुनर्वसनानंतर परिसरातील भाविक भक्तांनी एकत्र येत जवळपास सव्वा कोटी रुपये लोक वाटा गोळा करून आधुनिक पद्धतीने मठाची निर्मिती केली आहे. आता येथे वेळोवेळी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. बुधवारी (दि.१३) गुरूपौर्णिमा निमित्त मठाधीश श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी सात वाजता येथील श्री विरभद्र मंदिरात रूद्राभिषेक, आठ वाजता श्री गुरूपाद पुजा, मंगल आरती, भजन या नंतर भाविकांना श्री गुरू गंगाधर महास्वामीजी यांचे दर्शन- आशीर्वाद. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भर पावसातही पंचक्रोशीतील शेकडो भाविक भक्तांनी दर्शन व महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, माजी सभापती मदन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड. दिपक जवळगे, बाजार समिती माजी उपसभापती बसवराज कारभारी, शिवसेना तालुकाप्रमुख तथा सरपंच मोहन पणुरे, पंचायत समितीचे उपसभापती व्यंकट कोरे, संघाचे जिल्हा प्रचार विनायक अस्वार, आमदार चौगुले यांचे स्वीय सहाय्यक सदानंद शिवदे – पाटील, सरपंच रामचंद्र आलुरे (अणदुर), बबन फुलसुंदर (वडगाव वाडी), अशोक राजमाने (होर्टी) रतन लामजने (सुपतगाव) नागनाथ पाटील (सय्यद हिप्परगा) चेअरमन दत्तात्रय चटगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीशैल्य भैराप्पा, शिवराज चिनगुंडे, नगरसेवक अविनाश माळी आदींनी गुरुपोर्णिमा निमित्त मठाधीपती श्री गंगाधर महास्वामीजी यांचे आशिर्वाद घेतले. मठ कमिटीकडून पावसाचा अंदाज पाहून व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसवराज कारभारी, मोहन पणुरे, मल्लिनाथ डिग्गे, राजशेखर वेलदोडे, महादेव मोघे, सत्येश्वर कारभारी, गुंडाप्पा कारभारी, संजय तांबडे, तम्मा कोराळे, सुभाष सारणे, योगीराज सोळसे, जगदीश हावळे, महेश कोरे, प्रदीप कारभारी, अप्पासाहेब तांबडे, आकाश पाटील, गुरुनाथ बिराजदार, बसवराज स्वामी, चिदानंद शास्त्री आदीनी पुढाकार घेतला.