वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुक्यातील तावशिगड येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ९ दिव्यांगांना निधी वाटप करण्यात आली.
लोहारा तालुक्यातील तावशिगड येथे ग्रामपंचायतच्या वतीने नऊ दिव्यांगांना प्रत्येकी एक हजार रुपये या प्रमाणे निधीचे वाटप करण्यात आले. सरपंच मधुमती राजपाल पाटील यांच्या हस्ते हा निधी वाटप करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष भुसे, ग्रामपंचायत सदस्य गजानन मिटकरी, लक्ष्मण माने, राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शौकतअली मासुलदार यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.