वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ३ पुलांच्या कामांसाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून नाबार्ड- २८ योजनेअंतर्गत ५ कोटी ९० लक्ष रु. निधी मंजुर झाला आहे.
या योजने अंतर्गत तीन पुलांसाठी निधी मंजूर झाला आहे अशी माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे. यात १. रामा २११ ते आष्टा का. ते जिल्हा सरहद्द प्रजिमा-४६ रस्त्यावर (आष्टा का. गावाजवळ) लहान पुलाचे बांधकाम करणे या कामासाठी एक कोटी २० लक्ष रुपये, २. रामा २११ ते कारभारी वस्ती ते नागुर रस्ता ग्रा.मा.१६ रस्त्यावर लोहारा खु. गावाजवळ (द्वारका नदीवर) पुलाचे बांधकाम करणे या कामासाठी २ कोटी रुपये तसेच प्रजिमा ४५ ते हिप्परगा सय्यद हराळी उदतपुर इजिमा- १०० रस्त्यावर (तावशीगड गावाजवळ) पुलाचे बांधकाम करणे या कामासाठी २ कोटी ७० लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. या तीन कामांसाठी एकूण ५ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.
सदर महत्वाच्या पुलांच्या कामांसाठी मंजुरी दिल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.