नागरिकांना पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने या टाकीचे ग्रामपंचायतीच्या मार्फत लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच प्रविण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटुकणे, माजी सरपंच गणेश जाधव माजी उपसरपंच संभाजी वडजे, राम नाना पाटिल, शिवानंद राठोड, प्रा. अतुल बुरटुकणे, यशवंत बुरटुकणे, बालाजी बुरटुकणे, सचिन साळुंके, सुरज साळुंके, खंडू साळुंके, अनंत साळुंके, आदेश साळुंके, श्रीकांत जाधव, सुरज पाटिल, महादेव बुरटुकणे, किशोर बुरटुकणे, भैया बाबर आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शितलनगर तांडा येथे मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. धानुरीचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुका उपाध्यक्ष विठ्ठल बुरटुकणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.