वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील धानुरी येथे वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने ३० बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. सोमवारी ( दि.२१) या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून लोहारा तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होत चालली होती. परंतु गेल्या आठवड्यात तालुक्यातील धानुरी येथे रुग्णसंख्या वाढत चालली होती. धानुरी गावातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १२२ पर्यंत गेली होती. त्यामुळे धानुरी गावातील परिस्थिती चिंताजनक झाली होती. धानुरीत वाढत चाललेली रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य विभाग, प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या. तसेच आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड यांनीही भेट देऊन पाहणी केली होती. तसेच प्रशासनास सूचना दिल्या होत्या. तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन धानुरीत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे शिवसेना – युवासेनेच्या वतीने गावातील जिल्हा परिषद शाळेत ३० बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. या विलगीकरण कक्षाचे उदघाटन सोमवारी करण्यात आले. तसेच शिवसेना-युवासेना तर्फे सॅनिटीझर, ऑक्सिमीटर, पल्स मीटर, स्वयंसेवकासाठी लागणार हँड ग्लोज, मास्क, कोरोनाबाधित रुग्णासाठी लागणारे औषध, गावात फवारणीसाठी लागणारे सोडियम हायपोक्वोराईट सुपूर्द करण्यात आले.
यावेळी युवा नेते किरण गायकवाड, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना लोहारा शहरप्रमुख सलिम शेख, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी, ग्रामसेवक प्रदिप जाधव, बाजार समिती उपसभापती आनंदराव सुर्यवंशी, माजी सरपंच गणेश जाधव, तिरुपती साळुंखे, आकाश जाधव, परमेश्वर साळुंके, राहुल जाधव, शुभम साळुंखे व देखभाल करणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक व शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.