वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुप गणेश मंडळाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ सोमवारी (दि.१३) करण्यात आला.
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुप कडून गणेशोत्सवात दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यावर्षी स्वराज्य ग्रुप च्या वतीने कोरोना जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या हस्ते सोमवारी (दि. १३) करण्यात आला. कोरोना विषाणू संबंधित माहिती देणाऱ्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, वि.का. सोसायटीचे चेअरमन नागनाथ कारभारी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, सचिन रनखांब, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याबरोबरच नागरिकांनी स्वतः देखील सतर्क राहून काळजी घेणे आवश्यक आहे. नुकतीच दुसरी लाट ओसरली असली तरी देखील कोरोना आजार कमी झालेला नाही. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन त्याप्रमाणे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन स्वराज्य ग्रुपच्या वतीने भातागळी ग्रामस्थांना यावेळी करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पवन जगताप, महादेव आनंदगावकर, राहुल चव्हाण, महादेव जगताप, राहुल खोत, मंगेश आनंदगावकर, किरण इंगळे, महेश जगताप, कैलास इंगळे, अनिकेत कदम, महेश इंगळे, संकेत आनंदगावकर, महेश खोत, खंडू फत्तेपुरे, गौरव गिरी आदींनी परिश्रम घेतले.