वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना लोकसहभागातून सुरु करण्यात आलेल्या आयसोलोशन केंद्राला गया फाउंडेशन पुणे (माकणी) यांच्या वतीने आँक्सिजन मशीन भेट देण्यात आली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माकणी गावामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढली होते. अशा वेळी गावातील अनेकांना लोहारा, तुळजापुर, उस्मानाबाद येथे नेण्यात येत होते. त्यावेळी गावातील नागरिकांना तेथे गेल्यावर बेड, आँक्सिजन मिळत नव्हते ही बाब लक्षात आल्या नंतर सरपंच विठ्ठल साठे यांनी ग्रामपंचायत मध्ये बैठक घेऊन लोकसहभागातून २५ बेडचे आयसोलोशन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव ग्रामस्था समोर मांडला. याला सर्वांनी होकार दिला. लोकसहभागातून रक्कम गोळा करण्यात आली. यावेळी गया फाउंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय राठोडे यांनी फाउंडेशनच्या वतीने एक आँक्सिजन मशिन देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रविवारी आँक्सिजन मशिन भेट देण्यात आली. यामुळे तात्पुरत्या स्वरुपात रुग्णांची सोय होणार आहे.
यावेळी सरपंच तथा कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष विठ्ठल साठे, उपसरपंच तथा कोरोना दक्षता समितीचे उपाध्यक्ष वामन भोरे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, सदस्य गोवर्धन आलमले, बाळू कांबळे, सरदार मुजावर, अभिमन्यू कुसळकर, अच्युत चिकुंद्रे, अँड.दादासाहेब जानकर, गया फाउंडेशन सदस्य दिगबंर राठोडे, फुलचंद आळंगे, मारुती जाधव, उमाशंकर कलशेट्टी, गौरीशंकर कलशेट्टी, शिवाजी साठे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मनाळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडित ढोणे, बळीराम दळवे, प्रदिप पाटील आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!
No Result
View All Result