लोहारा – वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क – सुमित झिंगाडे
लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (दि.६) शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच भाग्यश्री पाटील, उपसरपंच हुसेन शेख, ग्रामपंचायत सदस्य मनोज देशपांडे, ग्रामसेवक एन. बी. भोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, सोसायटी चेअरमन मुरलीधर पाटील, ग्रा.पं. शिपाई बबन बाबर, कमलाकर देशपांडे, संगणक परिचालक अमोल कांबळे, रोजगार सेवक युवराज गोरे, मुख्याध्यापक राम पांचाळ, आरोग्य सेवक देडे, आरोग्य सेविका कोमल भालेराव, आशा गटप्रवर्तक राजश्री साळुंके, लता साळुंके, सुनिता बडुरे, जीवन पाटील, नितीन देशपांडे, गोपाळ माने, दादासाहेब बाबर, मुरली शिंदे, साहिल मुल्ला, तानाजी जाधव, विलास गोरे, नागनाथ लादे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.