वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
भारतीय नौवहन निगम लिमिटेड, पोत परिवहन मंत्रालय, मुंबई च्या सी.एस.आर. योजने अंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ( अलिम्को ) मुंबई, समाजकल्याण विभाग जि. प. उस्मानाबाद व निवासी दिव्यांग शाळा, सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ( दि.३० ) सकाळी १० वाजता लोहारा तालुक्यातील निवड झालेल्या पात्र दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वितरण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत करण्यात आले आहे.
लोहारा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना कृत्रिम साहित्य वाटपासाठी दि. २८ व २९ जानेवारी 2021 या कालावधीमध्ये सास्तूर येथे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर तपासणी शिबीरातील पात्र दिव्यांग बांधवांनी आपल्या कृत्रिम साहित्य निवडीच्या पावतीसह शुक्रवारी दि. ३० जुलै रोजी सकाळी दहा वाजता आपले साहित्य प्राप्त करून घेणेसाठी निवासी दिव्यांग शाळा, सास्तूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (आलिन्को ) मुंबई चे प्रकल्प समन्वयक कमलेश यादव, दिव्यांग कल्याण विभागाचे वैद्यकीय सा.का. भारत कांबळे, सहाय्यक सल्लागार एस.एम. शिंदे, निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बी.टी. नादरगे, प्राचार्य भरत बालवाड यांनी केले आहे.
दिव्यांग बांधवांनी साहित्य स्विकारणेसाठी येते वेळी कोव्हिड १९ च्या संदर्भातील आवश्यक ती खबरदारी घ्यावी. प्रत्येकांनी मास्क परिधान करावा असे संयोजकांच्या वतीने बी.टी. नादरगे यांनी कळवले आहे.