वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे शनिवारी (दि.१३) कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे कृषी विभागाच्या वतीने या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी मासिकाचे वाचन करण्यात आले. या शेती शाळेत कृषी सहाय्यक दिपक जाधव यांनी शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत विविध योजना, एमआरईजीएस अंतर्गत फळबाग, गांडूळ, नॅडेप आदी योजनांमधे शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन केले. तसेच शेतकरी मासिकाचे वाटप माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच यशवंत कासार, तंटामुक्ती अध्यक्ष फजल कादरी, लिपिक बाबुराव सुतार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.