वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. सास्तुर गावचे सुपुत्र सीमेवर लढणारे भारतीय सैनिक हरिदास घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय सैनिक हरिदास घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सास्तुरचेच सुपुत्र भारतीय सैनिक अमर क्षिरसागर हे ही उपस्थित होते. सास्तुरचे सरपंच यशवंत कासार आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत भारतीय सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहन करुन एक आदर्शच निर्माण केला आहे. खरेच सास्तूर गावच्या दृष्टीने ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी ग्रा.प.सास्तूरच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुनील रावसाहेब माने यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरास्कार मिळाल्याबद्द सत्कार करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी के. डी. निंबाळकर, सर्व ग्रा. प. सदस्य, ग्राम विकास अधिकारी डी. आय. गोरे, व ग्रामस्थ उपस्थित होते.