लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथे दि. २३ ते २५ सप्टेंबर २०२२ रोजी दिव्यांग बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा परिसरातील बालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील तेरा वर्षापासून रोटरी क्लब लंडन इंग्लंड येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. जॉन क्लेग व त्यांचे ५ सहकारी डॉक्टर तसेच मुंबईचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. मयुरेश वाळके, डॉ. प्रमोद काळे व त्यांचे इतर ५ सहकारी डॉक्टर्स, अंबरनाथ देवनार येथून येणार आहेत. डॉ जॉय पाटणकर स्मृती प्रीत्यर्थ परिचारक फोऊडेशन पंढरपूर, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर व निवासी दिव्यांग शाळा सास्तूरच्या सहकार्याने हे शिबीर दर वर्षी आयोजित केले जाते. मागील २ वर्ष कोव्हीड १९ मुळे शिबीर झाले नाही. आत्तापर्यंत १३ शिबिरामधून जवळपास १२०० च्या वर बालकांच्या CTEV, टेडन लेन्दनिग व इतर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत व आज हि बालके स्वतच्या पायावर उभी राहून चालू शकत आहेत त्यामुळे दिव्यांग बालकांच्या व नातेवाईक यांच्या चेहर्यावर हास्य फुलत आहे. शिबिराचे विशीष्ट्ये लंडन व मुंबई यथील तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते मोफत शस्त्रक्रिया. ० ते १४ वयोगटातील कुठल्याही जिल्ह्यातील अपंगत्व असलेली बालके. २१ दिवसानंतर तज्ञ डॉक्टरांच्या समक्ष पुनर्तपासणी. शिबिरात बालकांची तपासणी उपचार व शस्त्रक्रिया सर्व मोफत.
तरी दि २३ ते २५ सप्टेंबर २०२२ रोजी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर व इतर जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू बालकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रमाकांत जोशी प्रकल्प अधिकारी स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर व श्री बी.टी. नादरगे मुख्याध्यापक निवासी दिव्यांग शाळा सास्तूर यांनी केले आहे. शिबिरासाठी येताना बालकांना फक्त दुध बिस्कीट खाऊ घालावे असेही आवाहन करण्यात आले आहे.