वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयातील गुणवंत विद्यार्थांना उल्हास ट्रस्ट,चेन्नई यांच्यामार्फत शिष्यवृत्ती देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. पराग बिसन, पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव पी. एल. जाधव होते. यावेळी हिप्परगा (रवा) चे सरपंच राम मोरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पराग बिसन यांनी विद्यार्थ्यांना माय डायरी ऑफ ड्रीम्स या संकल्पनेवर मार्गदर्शन करून स्वप्ने पहा आणि सत्यात उतरवण्यासाठी जिद्दीने, चिकाटीने प्रयत्न करा असा संदेश दिला. यावेळी त्यांनी अनेक महान व्यक्तींचे संदर्भ सांगितले. या कार्यक्रमात इयत्ता नववीतील पाच गुणवंत विद्यार्थी कु. अंकिता पाटील, कु. माधुरी कोरे, कु. सृष्टी जाधव, कु. सानिका मोरे, कु. गायत्री मोरे यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच ९ वी, १० वी च्या सर्व विद्यार्थांना माय डायरी ऑफ ड्रीम्स या डायरीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. जे. मनोहर यांनी तर जि. डी. मैंदाड यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. भोयटे, शिक्षक एम.के. जाधव, बी.एस. स्वामी, ए.व्ही, जाधव, एस.के जाधव आदींसह कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.