वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभाग अंतर्गत ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा आयोजित उपजीविका वर्ष 2022-23 महाजीविका अभियान जनसेवा महिला प्रभागसंघ सास्तुर अंतर्गत स्त्री शक्ती महिला ग्रामसंघ होळी व ग्रामपंचायत कार्यालय होळी यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील होळी येथील महात्मा गांधी विद्यालय समोरील मैदानात रविवारी (दि.२८) आठवडी बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. होळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सरोजा बिराजदार व जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड यांच्या शुभहस्ते बाजाराचा शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी बोलताना समाधान जोगदंड म्हणाले की, महिलांनी वेळोवेळी अभियानाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा सदुपयोग करून घ्यायला हवा व याही पुढे जाऊन महिलांनी आपली उत्पादने बाजारपेठेत विक्री होण्याच्या दृष्टीने पॅकेजिंग, लेबलींग व मार्केटिंग वर भर दिला पाहिजे. तसेच गावातील ग्रामस्थ यांच्या एकीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास उपसरपंच मा. दत्ता चव्हाण, ग्रामसेवक संजय कारभारी, स्त्री शक्ती महिला ग्रामसंघ अध्यक्षा सरोजा गायकवाड, तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे, तालुका समन्वयक राहुल मोहरे, प्रभाग समन्वयक प्रीतम बनसोडे, अविनाश चव्हाण, प्रभाग समन्वयक सेंद्रिय शेती प्रदीप चाव्हण, प्रभाग कृषी व्यवस्थापक सचिन गायकवाड, प्रभाग पशु व्यवस्थापक प्रदीप लोंढे, एमसीआरपी दैवता सरवदे, सीआरपी सुषमा मडोळे, नागाबाई पाटोळे यांच्यासह सास्तूर प्रभागातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती व गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.