वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि.२) मोठी गर्दी झाली होती. या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ५४ तर सदस्यपदासाठी ३५१ असे एकूण ४०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी दि. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत होती. सुरुवातीच्या चार दिवसांत मोजके नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. परंतु नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि.२) इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. १३ ग्रामपंचायतच्या या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ५४ तर सदस्य पदासाठी ३५१ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. या १३ ग्रामपंचायतसाठी दि. १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
————
ग्रामपंचायतनिहाय सरपंच व सदस्य पदासाठी दाखल झालेले नामनिर्देशन पत्र खालील प्रमाणे
ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सदस्य पदासाठी
जेवळी (उ) – ५ ५७
सालेगाव – ११ २९
वडगावगांजा – १ १२
उंडरगाव – ३ १८
सास्तुर – ४ ३६
नागुर – ३ २०
माळेगाव – ३ १५
अचलेर – ५ ३६
विलासपुर – ३ १४
तोरंबा – ४ १८
हिप्परगा (रवा) – ४ ३२
वडगाव वाडी – २ १३
माकणी – ६ ५१
———–
वडगाव (गांजा) बिनविरोध ?
वडगाव (गांजा) ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी फक्त एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहे. तसेच सदस्य पदाच्या ९ जागेसाठी १२ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. परंतु अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत उर्वरित तीन अर्ज माघारी घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वडगाव (गांजा) ग्रामपंचायत बिनविरोध होणार आहे.