वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील तावशीगड, सास्तूर, मुर्शदपुर, उदतपूर व सालेगाव आदी गावांमध्ये नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद व श्री छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय संस्था एकुरगावाडी तसेच उमेद अभियान लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने जलशक्ती अभियान राबविण्यात आले.श्री छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कृषी व्यवस्थापक किशोर औरादे, संजय गुजरे, तंटामुक्ती अध्यक्ष राम मिटकरी, प्रभाग समन्वयक प्रीतम बनसोडे, कृषी व्यवस्थापक सचिन गायकवाड, पशु व्यवस्थापक प्रदीप लोंढे आदीनी गावोगावी जाऊन मार्गदर्शन केले. किशोर औरादे जलशक्ती अभियान अंतर्गत (कॅच द रेन) पाणी आडवा पाणी जिरवा या विषयावर माहिती सांगताना म्हणाले की, पाणी अडवून जमिनीमध्ये मुरल्यामुळे पाण्याची पातळी वाढते, मातीचे आरोग्य वाढते, विजेची बचत म्हणजे पैशाची बचत होते, वृक्ष संगोपन संवर्धन हरीत क्षेत्र वाढते, उन्हाळ्यातील पाणी समस्या कमी होते, पूरस्थिती नियंत्रित करता येते, गाव टँकरमुक्त करता येते, शेतकऱ्याचे जीवन व आर्थिक उत्पन्न वाढविण्यात मदत होते.भविष्यातील पाण्याचे महत्व ओळखून आज पाणी आडवणे व पाणी मुरवणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले. त्यानंतर पाच गावातील महिलांना पाण्याचे महत्व सांगितले. पाणी आडवा पाणी जिरवा या विषयावर बालाजी विद्यालय तावशीगडच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. पथनाट्य सादर करण्यात आले. गावातून पाणी आडवा पाणी जिरवा याविषयी पदयात्रा काढण्यात आली. पाणी अडवणे व पाणी जिरवणे, पाण्याचा वापर काटकसरीने करणे याची शपथ घेण्यात आली. जलशक्ती कार्यक्रम घेऊन ५ गावात पाणी आडवा पाणी जिरवा याचे महत्त्व जलशक्ती अभियान अंतर्गत राबविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छाया गोरे, सोनाली पवार, कुंभार, लक्ष्मी गायकवाड, पंचशीला मनोहर, अनुसया नटवे, विजयमाला देशमुख, निर्मला यादव, शिवकन्या बिराजदार, योगिता थोरात आदींनी परिश्रम घेतले.