वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यात शनिवारी दि. ४ सप्टेंबर रोजी १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. तसेच ज्यांना पहिला डोस घेऊन किमान ८४ दिवस झाले आहेत अशांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द, हिप्परगा (रवा), मार्डी, सालेगाव, उदतपुर, धानुरी, पांढरी (वि), वडगाव (गां), दस्तापुर या उपकेंद्रावर लसीकरण होणार आहे. तसेच लोहारा शहरातील भारतमाता मंदिर येथेही लसीकरण होणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या केंद्रावर केवळ १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच ज्या नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत आहे. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्यालाभार्थ्यांना प्रथम लसीकरण करण्यात येणार आहे. यावेळी लसीकरण केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.
तसेच तालुक्यातील सास्तुर व लोहारा ग्रामीण रुग्णालयात १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा डोस देण्यात येणार आहे. कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.