वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उमरगा येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली व उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.२) इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती दरम्यान उमेदवारांना त्यांच्या वार्डातील मूलभूत समस्या बाबत जाण आहे का तसेच लोहारा शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात त्यांच्या कोणत्या कल्पना आहेत व यापूर्वी त्यांनी केलेली विविध सामाजिक कार्य याबाबत त्यांच्याकडून आढावा घेण्यात आला. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, अबुलवफा कादरी, विजय फावडे, जनक कोकणे, अतिक पठाण, माहेबूब गवंडी, विशाल कोकणे, उमर पठाण, मधुकर भरारे, युनुस पटेल, संजय दरेकर, अविनाश माळी, दिपक रोडगे, आप्पा थोरात, गौस मोमिन, अमोल माळी, श्रीशैल स्वामी, प्रमोद बंगले, बाळासाहेब कोरे, प्रताप घोडके, संदीप माळी, मोहम्मदी हिप्परगे, भरत सुतार, श्याम नारायणकर, अमीन सुबेकर, आश्विन माळवदकर, श्रीकांत भरारे, नूर मोमीन, नितीन वाघ, हमीद पठाण आदि इच्छुकांनी यावेळी मुलाखती दिल्या.याच कार्यक्रमात आयुब अब्दुल शेख, जिंदावली शेख, संतोष माळवदकर, प्रशांत थोरात, मल्लिनाथ घोंगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी उमरग्याचे माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, शहर प्रमुख सलीम शेख, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, उपतालुकाप्रमुख जगन पाटील, आदी उपस्थित होते.