वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. ३) २४ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. त्यामुळे चार जागांसाठी एकूण ४५ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
लोहारा नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. उर्वरित चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी ( दि. २९) चार जणांनी एकूण आठ तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.३०) १३ ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. ३) २४ नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यामुळे उर्वरित चार जागांसाठी एकूण ४५ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठीही इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग सुरू असल्याचे दिसून आले. शिवसेना, काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांना आवश्यक असलेले पक्षाचे ए बी फॉर्म सोमवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार माने यांच्याकडे देण्यात आले. मंगळवारी ४ जानेवारी ला प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी करून वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १० जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेता येतील. १८ जानेवारी ला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल. त्यानंतर दि. १९ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. लोहारा नगरपंचायत निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी राजकुमार माने हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड हे काम पाहत आहेत.