Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी ८७.४६ टक्के मतदान – १७३१ पैकी १५१४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क – आज सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार

admin by admin
19/01/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतच्या चार जागांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.१८) सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान पार पडले. एकूण १७३१ पैकी १५१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी ८७.४६ टक्के मतदान झाले. किरकोळ शाब्दिक वाद वगळता चारही ठिकाणी मतदान शांततेत पार पडले.
लोहारा नगरपंचायतच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या प्रभागाची निवडणूक स्थगित केली होती. त्यामुळे १३ जागेसाठी निवडणूक पार पडली होती. त्यानंतर उर्वरित प्रभाग क्रमांक ८, १०, १६ व १७ या चार जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या चार जागांसाठी एकूण २२ जण निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारयंत्रणा राबविली होती. प्रभाग क्रमांक ८, १०, १६ व १७ या चार जागांसाठी मंगळवारी (दि.१८) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान पार पडले. यासाठी निवडणूक विभागाने चार मतदान केंद्राची व्यवस्था केली होती. प्रभाग क्र. ८ मध्ये ३७३ मतदार होते. त्यापैकी ३३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्र. १० मध्ये ४८५ मतदार होते. त्यापैकी ४२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्र. १६ मध्ये ३६२ मतदार होते. त्यापैकी ३२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर प्रभाग क्र. १७ मध्ये ५११ मतदार होते. त्यापैकी ४३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चार प्रभागातील एकूण १७३१ मतदारांपैकी १५१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी ८७.४६ टक्के मतदान झाले. या निवडणुकीच्या सर्वच १७ जागांची मतमोजणी बुधवारी (दि.१९) सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. यासाठी चार टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मतदानमतमोजणीलोहारा नगरपंचायत निवडणूक
Previous Post

लोहारा नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागेसाठी आज मतदान – चार प्रभागातील १७३१ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार

Next Post

लोहारा तालुक्यातील होळी येथे वाचन संस्कृती जागरण पंधरवडा अंतर्गत ग्रंथदिंडी – विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पुस्तक वाटप तसेच बक्षिस वितरण संपन्न

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील होळी येथे वाचन संस्कृती जागरण पंधरवडा अंतर्गत ग्रंथदिंडी - विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पुस्तक वाटप तसेच बक्षिस वितरण संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's