वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी (दि. १) पाच जणांनी नऊ ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
लोहारा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने एकूण १७ प्रभागात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी ( दि. १) पाच जणांनी एकूण नऊ ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. दि. ७ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. नगरपंचायत निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात इच्छुक उमेदवार व्यस्त असल्याचे दिसत आहे. तसेच आपल्या पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठीही जोरदार फिल्डिंग सुरू असल्याचे दिसून येत आहे. दि. ७ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येतील. ८ डिसेंबर ला प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी करून वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १३ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेता येतील. २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल. त्यानंतर दि. २२ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. लोहारा नगरपंचायत निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी राजकुमार माने हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.