प्रतिनिधी / लोहारा
पंचायत समिती लोहारा येथे सोमवारी (दि. २२) तालुका कृषी अधिकारी, स्वयंशिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने पीएफएमइ कार्यशाळा, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी पीएफएमइ योजना, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान,सेंद्रिय शेती विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर विस्तार अधिकारी किरण निंबाळकर यांनी पंचायत समितीच्या गोबर गॅस, गांडूळ प्रकल्प व इतर योजने विषयी मार्गदर्शन केले. यावेळी पीएफएमइ योजनेचे माहिती पत्रक व भाजीपाला बियाणे किट उपस्थित महिलांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.