वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि.१०) आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या आनंद मेळाव्यात १२० स्टॉल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध पदार्थांची विक्री केली.
विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद मेळाव्यामध्ये पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये एकूण १२० स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर पाटील, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांच्यासह उपनगराध्यक्ष आयुब शेख, अभिमान खराडे, बाळासाहेब पाटील, दिपक रोडगे, श्रीकांत भरारे, गोपाळ संदिकर उपस्थित होते. यावेळी पालक व नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.
तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या पदार्थांची खरेदी केली. शाळेचे मुख्याध्यापक मधुकर रोडगे, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, शिक्षक सुरेश अंबुरे, मच्छिंद्र भुजबळ, दत्तात्रय फावडे, राजकुमार दीक्षित, बालाजी यादव, गुरुनाथ पांचाळ, प्रवीण शिंदे, सुरेश साळुंखे, जहरुद्दीन शेख, अमोल जट्टे, संतोष माळवदकर, महानंदा चव्हाण, वर्षा चौधरी, सचिन शिंदे, मनीषा भोजने, ज्योती पाटील, प्रमोद सरवदे, नेहा भंडारे, सोनम कांबळे, दयानंद शिरसागर व अतुल भड उपस्थित होते. या मेळाव्याचा शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.