वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील बसवेश्वर गणेश मित्र मंडळाची बैठक विरेश स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात गणेशोत्सव कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
अध्यक्षपदी वैजिनाथ माणिकशेट्टी तर उपाध्यक्ष पदी संतोष फावडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच
सचिव पदी रामेश्वर वैरागकर, मिरवणूक प्रमुख म्हणून योगेश स्वामी यांची निवड करण्यात आली. या बैठकीसाठी शशांक पाटील, दयानंद स्वामी, विजय स्वामी, आप्पू स्वामी, विरभद्र फावडे, सुमित फावडे, प्रसाद जट्टे नागेश जटटे, पप्पू बोराळे, बाळु माशाळकर, सागर स्वामी, रवि नरुणे, प्रशांत माळवदकर, प्रविण संगशेटी, गणेश हिप्परगेकर, गणेश पालके, धनराज फरीदाबादकर, रामेश्वर मिटकरी आदी उपस्थित होते.