वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील बालाजी स्टील & इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने दसरा, दिवाळी सणानिमित्त खरेदीवर बजाज फायनान्सच्या वतीने १० ते ४० टक्के सूट, लकी ड्रॉ व भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे अशा ऑफर ठेवण्यात आले होते. या योजने अंतर्गत शहर व परिसरातील १२४ जणांनी इलेक्ट्रॉनिक, फर्निचरची खरेदी केली होती. त्यांचा सहभागानुसार मंगळवारी दि. ८ नोव्हेंबर रोजी लोहारा शहरातील बालाजी स्टील & इलेक्ट्रॉनिक्समध्ये. लक्की ड्रॉ काढण्यात आला. यात
पहिले विजेते – किरण चौगुले (पाटोदा ता. उस्मानाबाद) ३२ LED TV, दुसरे विजेते – नावेद मुल्ला (सास्तुर) वॉटर गिझर, तिसरे विजेते – मुस्तफा शेख (लोहारा) सँडविच मशीन, चौथे विजेते – अश्विनी थोरात खेड ( पैठणी साडी ), पाचवे विजेते – गुलाब रोडगे लोहारा ( पैठणी साडी ) हे विजेते ठरले आहेत.
यावेळी बजाज फायनान्सचे रोहित कराळे, हायर कंपनीचे निलेश चौबे, प्रभाकर बिराजदार, पत्रकार गिरीश भगत, गणेश खबोले, ईश्वर बिराजदार, ओम पाटील, पवन स्वामी, प्रा. राजपाल वाघमारे, शंभूलींग स्वामी, स्वप्निल माटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.