वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ व ट्रेनिंग प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने करियर मार्गदर्शन कार्यक्रम व टीसीएस. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर होते. यावेळी देवगिरी कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. गायकवाड सर, डॉ. पतंगे सर, प्राध्यापिका सबिहा शेख, प्राध्यापिका सविता मांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअर विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते टीसीएस कंपनीत निवड झालेल्या मोहिणी मोरे व सुप्रिया फरिदाबादकर या दोन विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. डी. चिकटे, प्रास्ताविक ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आर. डी. निकम तर कार्यक्रमाचा समारोप प्राध्यापिका महानंदा मोरे यांनी केला.या कार्यक्रमासाठी प्रा. विनोद तूंगे, प्रा. राजपाल वाघमारे, प्रा. आर.एस. पात्रे, प्रा. तौफीक कमाल, प्रा. व्यंकट घोडके, प्रा. प्रतीक्षा कदम, प्रा. रुपाली कोटणुर, प्रा. साधना चव्हाण, प्रा. सपना चव्हाण तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना रोजगानिर्मिती विषयक तसेच सॉफ्ट स्किल विषयी महत्वपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांनी केला.