वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात शनिवारी (दि.२०) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देशपांडे फाउंडेशन व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा व उमरगा येथील ग्रामीण भागातील महाविद्यालया मधील प्राचार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी म. शि. प्र. मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश भाऊ चव्हाण यांनी देशपांडे फाउंडेशन व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या मार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन नामांकित कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरी विषयी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी विस्तृत माहिती दिली. येणाऱ्या काळात लोहारा व उमरगा येथील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन नामांकित कंपनीत नोकरीची संधी देण्यात येणार असल्याची ग्वाही सरचिटणीस आमदार सतीश भाऊ चव्हाण यांनी दिली.
याप्रसंगी देशपांडे फाउंडेशनचे प्रमोद हुक्केरी, देवगिरी कॉलेज येथील प्रा. शेख सबिहा, बलसुर येथील भाऊसाहेब बिराजदार कॉलेजचे प्राचार्य, प्रा. डॉ. स्वाती यादव, प्रा. कपिल चव्हाण, विकास पाटील, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. विनायक पाटील, प्रा. कदम, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय माकणीचे प्रतिनिधी डॉ. संजय बिराजदार, प्रा. मुंडे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्गचे प्राचार्य डॉ. कोरेकर सर तसेच इतर महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक यांची उपस्थिती होती.