वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोहारा येथील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात ” स्वयंशासन दिन व अकरावी प्रवेशीत विद्यार्थीचे स्वागत ” समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी बारावी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील काही विद्यार्थीनची स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने प्राचार्य कु.भद्रे स्नेहा, उपप्राचार्य कु.खराडे साक्षी कल्याण तर पर्यवेक्षकपदी कु.कुंभार निकीता राम यांची गुणानक्रमे निवड करण्यात आली होती. अनेक विद्यार्थीनी वेगवेगळे विषय घेऊन अध्यापन करण्याचा अनुभवही घेतला. बारावीच्या विद्यार्थीनी, अकरावीच्या विद्यार्थीनीचे पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबद्दल त्याचे स्वागत केले. यावेळी स्वयंशासन दिनानिमीत्त शिक्षक बनलेल्या विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्याला शिकविणा-या सर्व शिक्षकांचा सत्कार केला. यावेळी प्रा. सुनंदा सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य यशवंत चंदनशिवे यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शोभा कांबळे यांनी तर आभार प्रा.अभिजीत सपाटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मल्लीनाथ चव्हाण, प्रा. राहुल मोरे, प्रा. बलवान कांबळे,प्रा. श्रीमती स्वाती माने, प्रा.श्रीमती. रत्नमाला पवार, प्रा. स्नेहलता करदुरे, प्रा.अंजली पटवारी, प्रा.शुभांगी कुलकर्णी, श्री. गणेश गरड व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.