वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तहसिल कार्यालयात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.२७) कर्ज वाटप समितीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा तालुक्यातील सर्व बँकांच्या पीककर्ज वाटपाचा शाखानिहाय आढावा घेत बँकांना दिलेले लक्षांक पूर्ण करणेबाबत सूचना केल्या.
तसेच बँक अधिकाऱ्यांनी गावोगावी कर्ज वाटप मेळावे घेवून जनजागृती करणे, गटसचिव यांच्या उपस्थिती व कार्यावर लक्ष ठेवणे, पीक कर्जासाठी आवश्यक फॉर्मचा नमुना व इतर आवश्यक बाबी याबाबतची माहिती बँकांत दर्शनी भागात डकविणे, पीकनिहाय कर्जाच्या रकमेबाबतची माहिती डकविणे, यांसह कर्जमाफी साठी पात्र असूनही अद्याप कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करून शासनाकडे पाठपुरावा करणे, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले अनुदान यांसह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.
या बैठकीस तहसीलदार संतोष रुईकर, सहायक निबंधक बालाजी काळे, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुकाप्रमुख जगन पाटील, अभिमान खराडे, प्रताप लोभे, नामदेव लोभे, विनोद मुसांडे, अरुण जगताप, बाळू कोरे, सागर पाटील, परमेश्वर साळुंके, रमेश जाधव, संदीपान बनकर, महेश घोटाळे, इंद्रजित लोमटे, गहिनीनाथ देशमुख, सुरेश दंडगुले, अनिल बायस यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी व शेतकरी बांधव उपस्थित होते.